शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३०१ शाळांचं भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:48 IST

सातारा : शाळेत डोकी किती? हे पाहून शिक्षणाचे धोरण ठरले जाऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय आहे?, याचा विचार शासन करणार आहे की नाही?, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७२ शाळा बंद करण्याच्या नव्या फतव्यानुसार दुर्गम भागातील मुले शालाबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली ...

सातारा : शाळेत डोकी किती? हे पाहून शिक्षणाचे धोरण ठरले जाऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय आहे?, याचा विचार शासन करणार आहे की नाही?, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातील ७२ शाळा बंद करण्याच्या नव्या फतव्यानुसार दुर्गम भागातील मुले शालाबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान, एकूण ३०१ शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे.कमी पटाच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याबाबत शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आदेश काढले आहेत. ० ते १० पट असणाºया सातारा जिल्हा परिषदेच्या ३०१ प्राथमिक शाळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे. ही कार्यवाही लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कमी पटामुळे राज्यातील सुमारे १३०० प्राथमिक शाळांवर गंडांतर आले आहे.प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीचे परिपत्रक पाठविले आहे. कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळेत समायोजन करावे, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.दरम्यान, जिल्ह्यात दहाहून कमी पटसंख्या असलेल्या ३०१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळा आता बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नजीकच्या कोणत्या शाळेत समायोजन करायचे? याबाबतही माहिती जिल्हा परिषदेने तयार केली असल्याचे वृत्त आहे.शिक्षण संचालकांनी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यात पालकांमध्ये गुणवत्तेबाबत चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे चांगली गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे.कमी गुणवत्तेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील तरतुदींचे उल्लंघन न करता कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करणे योग्य आहे.दरम्यान, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या कमी होत असल्याच्या शिक्षण संचालकांच्या मताशी शिक्षक संघटना सहमत नाहीत. शाळेचा पट कमी होण्यास केवळ गुणवत्ताच कारणीभूत नाही. स्थानिक राजकीय व्यक्तींच्या खासगी शाळा, नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना दिलेली मंजुरी हेही कारणीभूत आहे.शासनाचा निकष काय सांगतो?शासनाच्या निकषानुसार ३० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक नेमण्यात येतो. मात्र दुर्गम, डोंगरी भागात विद्यार्थी पटसंख्या अत्यल्प आहे. अनेक ठिकाणी द्विशिक्षकी शाळा आहेत. सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. शाळा बंद झाल्या तर मुलांचा हा हक्क राखला जाणार आहे का?, असा शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.कमी पटाच्या शाळेतीलगुणवत्ता कमी कशी?कमी पटाच्या शाळेत गुणवत्ता कमी आहे याला आधार काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न शिक्षक आमदारांकडून आक्रमकपणे मांडला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिक